पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वीय सचिव म्हणून विवेक कुमार यांची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Appointment of Vivek Kumar as Personal Secretary to Prime Minister Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वीय सचिव म्हणून विवेक कुमारांची नियुक्ती

आयएफएस (IFS) अधिकारी विवेक कुमार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे खाजगी सचिव (Personal Secretary) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २००४ च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी विवेक कुमार सध्या पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) संचालक आहेत. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) विवेक कुमार यांची पंतप्रधान मोदींचे स्वीय सचिव म्हणून नियुक्तीला मंजुरी दिली. (Appointment of Vivek Kumar as Personal Secretary to Prime Minister Narendra Modi)

विवेक कुमार हे संजीव कुमार सिंगला यांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहतील. संजीव कुमार सिंगला हे इस्राईलमधील भारताचे राजदूत म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. १९९७ बॅचचे आयएफएस (IFS) अधिकारी सिंगला यांची २०१४ मध्ये पंतप्रधानांचे पीएस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

हेही वाचा: चतुर्वेदींना भाजपचे उत्तर; आम्ही देशवासीयांसमोर झुकतो, ठाकरे सरकार तर...

संजीव कुमार सिंगला यांना तेल अवीव येथील भारतीय दूतावासात पोस्टिंग केल्यानंतर भारतात परत बोलावण्यात आले आणि ते पंतप्रधान कार्यालयात सेवा देण्यासाठी भारतात परतले. ते आता इस्राईलमध्ये राजदूत म्हणून परतणार आहेत. विवेक कुमार यांची नियुक्ती त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून लागू होईल. त्यांचा कार्यकाळ सह-टर्मिनस आधारावर किंवा पुढील आदेशापर्यंत असेल, असे कुमार यांच्या नियुक्तीबाबत जारी केलेल्या अधिकृत आदेशात असे म्हटले आहे.

यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला माजी पेट्रोलियम सचिव तरुण कपूर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे नवीन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तरुण कपूर हे १९८७ च्या बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी हिमाचल प्रदेश सरकारमधील अतिरिक्त मुख्य सचिवांसोबत ऊर्जा, पर्यावरण आणि वने, उत्पादन शुल्क आणि पीडब्ल्यूडी या खात्यांमध्ये काम केले आहे.

Web Title: Appointment Of Vivek Kumar As Personal Secretary To Prime Minister Narendra Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra Modi