राष्ट्रीय पुरस्कार देताना पक्षपातीपणा - चित्रपट दिग्दर्शक मुरुगादोस

वृत्तसंस्था
रविवार, 9 एप्रिल 2017

नुकत्याच जाहीर झालेल्या 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहेत. चित्रपट निर्माता ए. आर. मुरुगादास यांनी हे पुरस्कार देताना पक्षपातीपणा झाल्याचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली - नुकत्याच जाहीर झालेल्या 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहेत. चित्रपट निर्माता ए. आर. मुरुगादास यांनी हे पुरस्कार देताना पक्षपातीपणा झाल्याचा आरोप केला आहे.

मुरुगादास हे तमिळ चित्रपट दिग्दर्शक असून त्यांनी काही हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याशिवाय ते निर्माते आणि लेखकही आहेत. ट्‌विटरद्वारे मुरुगादास याने टीका केली आहे. 'ज्युरींमधील लोकांनी पुरस्कारांमध्ये हस्तक्षेप करत पक्षपातीपणा केला आहे', अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. केवळ मुरुगादास यांनीच नव्हे तर "अलिगढ' या चित्रपटाचा दिग्दर्शक हंसल मेहता यानेही चित्रपट पुरस्कारांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केली आहे.

ज्युरींच्या निर्णयाचा मी सन्मान करत असल्याचे म्हणत त्यांनी एका ज्युरी सदस्याने केलेले वक्तव्य असंवेदनशील आणि अस्वस्थ करणारे असल्याचे म्हटले आहे. "चित्रपट पाहत असताना आपल्याला जाणीव होते की अलिकडचे चित्रपट हे सामाजिक समस्येपेक्षा समलैंगिक संबंधांवर आधारित असतात', असे वक्तव्य एका ज्युरीने केल्याचे हंसलने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

Web Title: AR Murugadoss alleges that the jury headed by Priyadarshan was biased