रमजानमुळे शस्त्रसंधी 

पीटीआय
गुरुवार, 17 मे 2018

नवी दिल्ली - हिंसाचारात होरपळणाऱ्या जम्मू आणि काश्‍मीरमधील सुरक्षा दलांच्या मोहिमा रमजानच्या काळात थांबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज केंद्र सरकारने घेतला. पण, आणीबाणीची स्थिती उद्‌भवल्यास सुरक्षा दले प्रतिकार करतील, तसेच निष्पाप लोकांच्या संरक्षणासाठीही आमची यंत्रणा कटिबद्ध असल्याचे गृहमंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज या निर्णयाची माहिती जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना दिली. रमजानच्या काळामध्ये मुस्लिम बांधव आणि भगिनींना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले. जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि विरोधी पक्ष नेते उमर अब्दुल्ला या दोघांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. 
 
Web Title: Armaments due to ramjan