कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी उपसले निर्बंधांचे शस्त्र

अहमदाबाद - परगावाहून दाखल झालेल्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी घेतली जात आहे. त्यासाठी स्वॅबचा नमुना घेताना वैद्यकीय कर्मचारी.
अहमदाबाद - परगावाहून दाखल झालेल्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी घेतली जात आहे. त्यासाठी स्वॅबचा नमुना घेताना वैद्यकीय कर्मचारी.

कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी रात्रीच्या संचारबंदीच्या कालावधीत भर
नवी दिल्ली -  देशभरातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांनी आता कठोर निर्बंध लागू करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांतील संसर्ग वाढत चालला आहे. गुजरातमध्ये पुढील आदेश येईपर्यंत सार्वजनिक उद्याने आणि पार्क बंद ठेवली जाणार आहेत. पंजाबमध्ये आता रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी लागू असेल. 

नोएडा, गाझियाबादमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी लुधियाना, जालंधर, पतियाळा, मोहाली, अमृतसर, गुरुदासपूर, होशियारपूर आणि कपुरथळा या जिल्ह्यांमध्ये रात्रीचे निर्बंध अधिक कठोर करण्याचे निर्देश दिले आहेत . दिल्लीमध्ये मात्र कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असल्याचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले. झारखंडने कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तमिळनाडूत मिनी क्लिनिक
तमिळनाडू सरकारने लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी राज्यामध्ये मिनी क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकनेही लशी वाया जाऊ नयेत म्हणून कठोर उपाययोजना आखायला सुरुवात केली असून तसे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहेत.

विमान कंपन्यांची कारवाई
कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर विमान कंपन्यांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. एअर एशिया इंडिया कंपनीने सोमवारी गोवा- मुंबई विमानातून दोन उपद्रवी प्रवाशांना थेट खाली उतरविले तर इंडिगोने दोन प्रवाशांना सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिले. 

दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील कोरोनाची लस द्यावी. मी देखील लस घ्यायला तयार आहे.
- राकेश टिकैत, शेतकरी नेते

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com