VIDEO | स्वप्नांसाठी तरुण चक्क ५० तासांमध्ये धावला ३५० किलोमीटर

भारतीय सैन्यात भरती होण्याची माझी इच्छा आहे. दोन वर्षांपासून भरती बंद आहे.
Army Recruitment
Army Recruitmentesakal

दिल्ली : गेल्या कित्येक दिवसांपासून लष्करातील जागा रिक्त आहेत. त्यासाठी भरती सुरु करण्यासाठी वेगवेगळ्या व्यासपीठावरुन आवाज उठवला जात आहे. या अंतर्गत राजस्थानचे सुरेश भिंचर या तरुणाने जे पाऊल उचलले त्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहेत. राजस्थानमधील या युवकाने चक्क ५० तासांमध्ये ३५० किलोमीटर धावला आणि पोहोचला दिल्लीतील (Delhi) आंदोलनस्थळी. या युवकाला भारतीय सैन्यात भरती (Army Recruitment) व्हायचे आहे. त्यामुळे तो राजस्थानमधील सीकरपासून दिल्लीतील एका आंदोलनात सामील होण्यासाठी चक्क ५० तास धावला. (Army Aspirant Suresh Bhinchar Run 350 Kilometer From Sikar To Delhi)

Army Recruitment
Nanded | धक्कादायक ! नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना तरुण सुरेश भिंचर म्हणाला, माझे वय २४ वर्ष आहे. मी नागौरा जिल्ह्यातून (राजस्थान) आलो आहे. भारतीय सैन्यात भरती होण्याची माझी इच्छा आहे. दोन वर्षांपासून भरती बंद आहे. नागौर, सीकर, झुनझुनू येथील युवकांचे वय निघून चालले आहे. मी धावत दिल्लीत येऊन तरुणांचा उत्साह वाढवण्यासाठी आलो आहे.

Army Recruitment
पाकिस्तानसाठी रशिया आला धावून, अमेरिकेवर केला मोठा आरोप

दिल्लीत उठवतोय आवाज

वास्तविक लष्कराची भरती सुरु करण्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरु आहे. त्यात भरतीची तयारी करणारे तरुण येथे पोहोचत आहेत. यापैकीच आहे सीकरचा सुरेश भींचर. सुरेशने लष्करातील भरतीचा मुद्दा उचलण्यासाठी अनोखी पद्धत वापरली. त्याने सीकरहून दिल्लीचे अंतर धावत पूर्ण केले. सुरेश म्हणाला, गेल्या दोन वर्षांपासून लष्करात भरती थांबली आहे. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी दिल्लीत आलो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com