"यूएन'चा अहवाल लष्करप्रमुखांनी फेटाळला

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 जून 2018

काश्‍मीर खोऱ्यात मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचा दावा करणारा संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज फेटाळून लावत तो पूर्वग्रहदूषित असल्याचे म्हटले आहे. भारतीय लष्कराचे मानवी हक्काच्या संवर्धनातील आतापर्यंतचे योगदान सर्वज्ञात असून, काश्‍मीरमधील जनता आणि आंतरराष्ट्रीय समुदायालादेखील ही बाब माहिती असल्याचे त्यांनी नमूद केले. 
 

नवी दिल्ली : काश्‍मीर खोऱ्यात मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचा दावा करणारा संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज फेटाळून लावत तो पूर्वग्रहदूषित असल्याचे म्हटले आहे. भारतीय लष्कराचे मानवी हक्काच्या संवर्धनातील आतापर्यंतचे योगदान सर्वज्ञात असून, काश्‍मीरमधील जनता आणि आंतरराष्ट्रीय समुदायालादेखील ही बाब माहिती असल्याचे त्यांनी नमूद केले. 

या अशा अहवालांवर फारशी चिंता करण्याचे कारण नाही, असे अहवाल हे चुकींच्या तथ्यांवर आधारित असतात तसेच ते जाणीवपूर्वक तयार केले जातात. भारतीय लष्कराची कामगिरी सर्वांना माहिती आहे. हे सत्य लोकांपासून लपून राहिलेले नाही,'' असेही रावत यांनी स्पष्ट केले. या महिन्याच्या प्रारंभीच संयुक्त राष्ट्रसंघाने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये काश्‍मीर आणि पाकव्याप्त काश्‍मीर या दोन्ही भागांमध्ये मानवी हक्काची पायमल्ली होत असून, याची आंतरराष्ट्रीय चौकशी होणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. तत्पूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा अहवाल याआधीच फेटाळून लावला आहे. 

Web Title: Army chief dismisses UN report on alleged rights violations in Kashmir