esakal | लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे आजपासून दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Army Chief General Manoj Naravane

चीन सीमेवर निर्माण झालेल्या तणावाबाबत प्रत्यक्ष सीमेवर असलेल्या ठाण्यांना भेट देऊन जवानांशी चर्चा करण्यासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे आजपासून दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर आले आहेत. 

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे आजपासून दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - चीन सीमेवर निर्माण झालेल्या तणावाबाबत प्रत्यक्ष सीमेवर असलेल्या ठाण्यांना भेट देऊन जवानांशी चर्चा करण्यासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे आजपासून दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर आले आहेत. या वेळी ते पर्वतीय प्रदेशातील भारतीय लष्कराच्या युद्धसज्जतेचाही आढावा घेतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करप्रमुख हे सीमेवरील ठाण्यांना भेट देऊन जवानांशी बोलणार आहेत. गेल्या आठवड्यात भारत-चीनमधील तणाव शिगेला पोहोचला असताना हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदुरिया यांनीही लडाख आणि श्रीनगरमधील हवाई तळाला भेट देत युद्धसज्जतेचा आढावा घेतला होता. लडाख दौऱ्यात जनरल नरवणे हे लेफ्टनंट जनरल हरिंदरसिंग यांच्याशी विशेष चर्चा करतील. हरिंदरसिंग यांनीच चीनबरोबरील लष्करी चर्चेच्या दुसऱ्या फेरीत भारताची भूमिका मांडली होती आणि त्यांचीच तुकडी येथील संवेदनशील सीमेचे रक्षण करते. काल त्यांनी चीनच्या कमांडरबरोबर तब्बल ११ तास चर्चा करत तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले होते. 

सर्वात मोठी बातमी - चीनी हॅकर्सकडून 5 दिवसात 40 हजार सायबर हल्ले...

loading image
go to top