पाक व्याप्त काश्मीरसाठी, फक्त आदेश द्या; लष्करप्रमुखांचं वक्तव्य

टीम ई-सकाळ
शनिवार, 11 जानेवारी 2020

भारतीय लष्कर कोणत्याही शेजारी राष्ट्राच्या आव्हानाला सोमेरे जाऊ शकते, असे लष्करप्रमुख नरवणे यांनी सांगितले.

नवी दिल्ली : पाक व्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होऊ शकतो. हा दावा कोणी सामान्य माणसाने किंवा राजकीय व्यक्तीने केलेला नाही. तर, खुद्द लष्कर प्रमुखांनी केलाय. लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांची आज पत्रकार परिषद झाली. त्यात त्यांनी पाक व्याप्त काश्मीरवर भाष्य केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'फक्त आदेश द्या'
भारतीय लष्कर कोणत्याही शेजारी राष्ट्राच्या आव्हानाला सोमेरे जाऊ शकते, असे लष्करप्रमुख नरवणे यांनी सांगितले. ते म्हणाले, 'पाक व्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचा आपल्या संसदेचा ठराव आहे. जर, संसदेला हे हवं असले तर, तो आपलाच भाग असेल. जर आम्हाला तसे आदेश मिळाले तर, त्या प्रमाणे आम्ही योग्य ती ऍक्शन घेऊ.' देशाच्या सर्व सीमांवर लष्कराची बारीक नजर असून, घुसखोर आणि शत्रू राष्ट्रांचे मनसुबे उधळण्याची लष्कराची सर्व तयारी आहे. पाकिस्तानच नव्हे तर, चीनच्या आव्हानालाही सामोरे जाण्याची भारतीय लष्कराची तयारी आहे, असे लष्करप्रमुख नरवणे म्हणाले.

सियाचीनला भेट
लष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नरवणे यांनी सीयाचीनमधील भारतीय छावणीला भेट दिली होती. त्यावेळी तेथील युद्ध स्मारकाला त्यांनी भेट दिली तसेच, तेथे तैनात जवानांशी नरवणे यांनी संवाद साधला. तसेच जवानांसोबत त्यांनी अल्पोपहारही घेतला होता. 

Image may contain: 3 people, people standing and outdoor

Image may contain: 3 people, outdoor, text that says "EKONEES"

Image may contain: 1 person, standing, food and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: army chief mukund naravane statement on pakistan occupied kashmir