ममतांमुळे आर्मी राजकीय वादातः पर्रीकर

यूएनआय
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

नवी दिल्लीः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भारतीय सैन्यदलाला विनाकारण राजकीय वादात ओढत आहेत, असा आरोप संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (शुक्रवार) केला. पश्चिम बंगालमधील टोल नाक्यांवर सैन्यदलाचे जवान तैनात करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल पोलिसांना विश्वासात घेऊनच घेतला होता, असा दावाही पर्रीकर यांनी केला. 

'मुख्यमंत्री बॅनर्जी ज्या पद्धतीने आर्मीबद्ल बोलल्या, त्याचा मला धक्का बसला. त्यांचे आरोप केवळ राजकीय नैराश्य दाखविणारे आहे,' असे पर्रीकर यांनी लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. 

'ईशान्य भारतातील राज्यांमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये टोल नाक्यांवर जवान तैनात केले जातात. याच पद्धतीचा प्रयोग गेल्या वर्षीही केला होता. गेली पंधरा वर्षे हा प्रयोग सुरू आहे. या राज्यांशिवाय झारखंड, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही हा प्रयोग राबविला जातो. कोलकत्यामधील टोल नाक्यांवर जवान तैनात करण्यापूर्वी पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाला विश्वासात घेतले होते. खरेतर मुळच्या नियोजनानुसार 28 ते 30 नोव्हेंबरला प्रयोग राबविण्यात येणार होता. तथापि, स्थानिक पोलिसांच्या विनंतीनुसार तारखा डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. कारण, 28 नोव्हेंबरला भारत बंद होता. जवान तैनात केल्यानंतर स्थानिक पोलीस आणि लष्कराने टोल नाक्यांची संयुक्त पाहणीही केली,' असे पर्रीकर यांनी सांगितले. 

बॅनर्जी यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत आणि त्यातून केवळ राजकीय नैराश्य दिसते आहे, अशी टीका पर्रीकर यांनी केली.

Web Title: Army is in controversy : Parrikar