काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला; जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
शनिवार, 3 जून 2017

कुलगाम जिल्ह्यातील लोअर मुंडा टोल पोस्टजवळ काझीगुंड भागात आज सकाळी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात एक जवान हुतात्मा झाला आहे, तर पाच जवान जखमी झाले आहेत.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात एक जवान हुतात्मा झाला आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील लोअर मुंडा टोल पोस्टजवळ काझीगुंड भागात आज सकाळी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात एक जवान हुतात्मा झाला आहे, तर पाच जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोअर मुंडा हा भाग जम्मू-श्रीनगर महामार्गापासून 100 किमी अंतरावर आहे. 

दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करून पळ काढला. दहशतवाद्यांच्या शोधासाठी परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत आहे. काश्मीरमधील परिस्थिती चिघडळलेली असून, दहशतवाद्यांकडून सतत लष्कराला लक्ष्य करण्यात येत आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
ऐतिहासिक शेतकरी संपात 48 तासात फूट; एक गट संपावर ठाम
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना गंडवलं: शरद पवार
शेतकरी संपाबाबत घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप : जयाजी सूर्यवंशी​
चोपडा: भाजीपाला फेकला रस्त्यावर
शेतकऱ्यांचा संप मागे; कर्जमाफीसाठी समिती 
शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आश्वासने
शेतकऱ्यांच्या पदरात पडले काय?; किसान सभा असमाधानी
सत्तर टक्के मागण्या मान्य झाल्याने संप मागे: धोर्डे​

मेनका गांधी रुग्णालयात दाखल

Web Title: Army convoy attacked by militants in J&K's Kulgam, one jawan killed