महिलेसोबत दिसलेल्या मेजर गोगोईंवर शिस्तभंगाची कारवाई

वृत्तसंस्था
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

मेजर गोगोईंसोबत ही महिला दिसल्यामुळे हॉटेल प्रशासनाने तातडीने पोलिसांना कळवले. त्यानंतर या तरूणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते व गोगोई यांच्या न्यायालयीन चौकशीचा आदेश दिला होता. या प्रकरणाचा तपास श्रीनगरचे पोलिस अधीक्षक सज्जाद शहा यांच्याकडे होता.  

नवी दिल्ली : श्रीनगरमधील हॉटेलमध्ये एका स्थानिक महिलेसह ताब्यात घेतलेल्या मेजर लितुल गोगोई यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. आर्मी कोर्टाने कर्तव्यावर असताना केलेल्या या प्रकारामुळे गोगोई यांना दोषी ठरवले आहे. तसेच स्थानिकांशी जवळीक साधल्याचा आरोप ही त्यांच्यावर आहे.

23 मे रोजी श्रीनगरमधील ग्रँड ममता हॉटेमध्ये सैन्यदलात मेजर या पदावर असलेल्या लितुल गोगोई यांना एका स्थानिक महिलेसह ताब्यात घेतले होते. ही महिला बडगाम येथील आहे. यानंतर सैन्यदलाने गोगोई यांच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते.   

मेजर गोगोईंसोबत ही महिला दिसल्यामुळे हॉटेल प्रशासनाने तातडीने पोलिसांना कळवले. त्यानंतर या तरूणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते व गोगोई यांच्या न्यायालयीन चौकशीचा आदेश दिला होता. या प्रकरणाचा तपास श्रीनगरचे पोलिस अधीक्षक सज्जाद शहा यांच्याकडे होता.  

Web Title: Army court of inquiry holds Major Gogoi guilty in hotel case