लष्कराने घुसखोरीचा कट उधळला; 5 दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 10 जून 2017

भारतीय हद्दीत घुसखोरी करत असलेल्य 39 दहशतवाद्यांना यावर्षी ठार मारण्यात आले आहे. तर, बुधवारपासून तिसऱ्यांदा दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावण्यात आला आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये शुक्रवारी रात्री भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावत केलेल्या गोळीबारात पाच दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. बुधवारपासून भारतीय लष्कराने 12 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलओसी) भारतीय हद्दीत प्रवेश करत असलेल्या दहशतवाद्यांचा कट लष्कराने उधळून लावला. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांवर केलेल्या गोळीबारात पाच दहशतवादी ठार झाले आहेत. तर, परिसरात आणखी शोधमोहिम राबविण्यात येत आहे.

भारतीय हद्दीत घुसखोरी करत असलेल्य 39 दहशतवाद्यांना यावर्षी ठार मारण्यात आले आहे. तर, बुधवारपासून तिसऱ्यांदा दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावण्यात आला आहे. उत्तर काश्मीरमधील माछिल, नौगाम, गुरेझ आणि उरी या सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
महात्मा गांधी 'चतुर बनिया' होते: अमित शहा
बाईला बाई होण्यासाठी कर भरावा लागणार?
#स्पर्धापरीक्षा -'ईएनव्हीआयएस' पर्यावरण पोर्टल​
ब्रिटनमध्ये त्रिशंकू स्थिती​

'सिद्धेश्‍वर'ची चिमणी पाडण्यास कोणी नाही तयार
जिगरबाज बांगलादेशचा न्यूझीलंडवर विजय

Web Title: Army foils infiltration bid in Kashmir’s Uri, 5 militants killed