शांतता हेच उद्दिष्ट : जनरल रावत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

"जम्मू-काश्‍मीरध्ये शांतता निर्माण करणे हेच लष्कराचे उद्दिष्ट आहे. भारतीय जवानांनी चीन आणि पाकिस्तान सीमेवरील परिस्थिती नेहमीच चांगल्या पद्धतीने हाताळली असल्याने याबाबत काळजी करण्याचे काही कारण नाही,' असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज सांगितले.

नवी दिल्ली : "जम्मू-काश्‍मीरध्ये शांतता निर्माण करणे हेच लष्कराचे उद्दिष्ट आहे. भारतीय जवानांनी चीन आणि पाकिस्तान सीमेवरील परिस्थिती नेहमीच चांगल्या पद्धतीने हाताळली असल्याने याबाबत काळजी करण्याचे काही कारण नाही,' असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज सांगितले.

लष्कराच्या वार्षिक पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका मांडली. "अफगाणिस्तानमध्ये अमेरिका आणि रशिया तालिबानबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न करत असून, भारतही त्यापासून दूर राहू शकत नाही. मात्र. हा नियम जम्मू-काश्‍मीरमध्ये लागू होत नाही.

चर्चा आपल्या अटींवर व्हायला हवी,' असे जनरल रावत म्हणाले. चर्चा आणि दहशतवाद एकाच वेळी शक्‍य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Army has managed situation well at borders says General Bipin Rawat