बर्फवृष्टीची चिंता न करता जवान धावले गरोदर महिलेच्या मदतीला

वृत्तसंस्था
बुधवार, 15 जानेवारी 2020

- जवानांनी केले गौरवास्पद काम

नवी दिल्ली : भारतीय लष्करातील जवान देशसेवेसाठी नेहमीच पुढे असतात हे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यातच आता गरोदर महिलेच्या मदतीला जवान धाऊन आले आहेत. गरोदर महिलेला रुग्णालयात न्यायचे होते. मात्र, गुडघ्यापर्यंत बर्फ असल्याने मोठ्या अडचणी येत होत्या. या अडचणींना तोंड देत जवानांनी गरोदर महिलेला रुग्णालयात नेले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय लष्करातील जवानांच्या 'चिनार कॉर्प्स'ने हे गौरवास्पद काम केले. या परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत होती. त्यामुळे गुडघ्यापर्यंत बर्फ येता होता. या बर्फवृष्टीमुळे गरोदर महिलेवर तातडीचे वैद्यकीय उपचार करण्यात अडचणी येत होत्या. मात्र, जवानांनी कशाचीही पर्वा न करता त्या महिलेला मदत केली.  

याबाबत पंतप्रधान मोदींनी ट्विट करून जवानांचे अभिनंदन केले. भारतीय लष्कर देशसेवेसाठी कायम सतर्क असते. अशाच प्रकारे देशसेवेसाठी जवान पुढे आहेत. जेव्हा कधी नागरिकांना मदतीची गरज असते, आपले लष्कर त्या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.

Image result for Prime Minister Narendra Modi hails their ‘valour and professionalism’

तसेच आम्हाला भारतीय लष्कराचा अभिमान आहे. आम्ही शमिना (आई) आणि त्यांची मुलगी यांच्यासाठी प्रार्थना करतो. मुसळधार बर्फवृष्टीमुळे गरोदर शमिना यांना तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज होती. अवघ्या चारच तासांत 100 हून अधिक जवान आणि 30 नागरिकांनी त्या महिलेला स्ट्रेचरवरून नेले. त्यानंतर बाळाचा जन्म रुग्णालयात झाला. आता आई आणि बाळ या दोघांची प्रकृती स्थिर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Army jawans carry pregnant woman to hospital in heavy snowfall