हुंडाबळी प्रकरणी लष्करातील मेजरला अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

पत्नीच्या मृत्युला जबाबदार धरत लष्करातील मेजरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने आत्महत्या केली होती. पत्नीच्या माहेरकडील मंडळींनी हुंड्यासाठी पती छळ करत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे.

हैदराबाद : पत्नीच्या मृत्युला जबाबदार धरत लष्करातील मेजरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने आत्महत्या केली होती. पत्नीच्या माहेरकडील मंडळींनी हुंड्यासाठी पती छळ करत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे.

'रेडिओ जॉकी' म्हणून काम करणाऱ्या एका महिलेने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. लष्कराने दिलेल्या निवासस्थानी हे दोघेही राहत होते. या प्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला आत्महत्येचे प्रकरण नोंद करून घेतले. मात्र मृत महिलेच्या माहेरकडील मंडळींनी तिचा पती हुंडा मागत असल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी हुंडाबळीचे प्रकरण दाखल करून घेतले. या प्रकरणानंतर काही वेळातच मेजरची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्याची खात्री लष्कराने दिली होती. आज (बुधवार) त्या मेजरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

Web Title: Army major arrested in dowry death case