'त्या' मेजरने मित्राच्या बायकोला केले 3000 कॉल

वृत्तसंस्था
सोमवार, 25 जून 2018

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीतील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कँट परिसरात शनिवारी लष्करातील अधिकाऱ्याची पत्नी शैलजा द्विवेदी यांची हत्या करण्यात आली. शैलजा आणि आरोपी निखील यांच्यात जानेवारी महिन्यापासून हत्येच्या दिवसापर्यंत तीन हजारपेक्षा जास्त वेळा मोबाईलवर संभाषण झाल्याची माहिती माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्याने या प्रकरणाच्या तपासाला नवे वळण लागले आहे.

सुत्रांच्या माहितीनूसार, गेल्या वर्षभरात तीन हजारपेक्षा जास्त वेळा आरोपी मेजर हांडा आणि शैलजा यांच्यात संभाषण झाले आहे. एका दिवसात 10 ते 15 वेळा मेजर हांडा शैलजाला फोन किंवा मेसेज करत असे. हांडाचे आणखी तीन महिलांशी संबंध असल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपी निखील हांडा शैलजा यांना 2015 पासून ओळखत होता, शैलजा यांच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती परंतू शैलजाचा त्यास नकार होता अशी माहिती पोलिसांनी दिली. 

निखिल हांडा हे यापूर्वी दीमापूर येथे तैनात होते. शैलजा द्विवेदी यांच्या हत्येप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली. शैलजा यांच्या मोबाईलवरून हांडा यांना शेवटचा फोन करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले. अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कँटच्या परिसरात शनिवारी शैलजा यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर सगळीकडे याबाबत चर्चा सुरु होत्या.

Web Title: Army Major made 3,000 calls in a year to colleague's wife he killed