अरुणाचलमधील अ‍ॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरला अपघात; 4 जणांचा मृत्यू, रेस्क्यू ऑपरेशन सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Helicopter Crashes news in Marathi

अरुणाचलमधील अ‍ॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरला अपघात; 4 जणांचा मृत्यू, रेस्क्यू ऑपरेशन सुरूच

गुवाहाटी : अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांग जिल्ह्यात शुक्रवारी पाच जणांना घेऊन जाणारे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. घटनास्थळावर आतापर्यंत चार मृतदेह सापडले आहेत. रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरची (एएलएच) वेपन सिस्टिम इंटिग्रेटेड आवृत्ती मिगिंग गावाजवळ कोसळलं. (Helicopter Crashes news in Marathi)

हेही वाचा: शिंदे-फडणवीस-राज ठाकरे भेटीवर रुपाली पाटील यांची टीका; म्हणाल्या छुप्या...

अपघातस्थळी जाण्यासाठी रस्त उपलब्ध नसल्याने तीन हवाई बचाव पथकं त्या ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. अजुनही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच असल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे.

आज सकाळी लिकाबली येथून उड्डाण केलेले हेलिकॉप्टर, लष्कराच्या जवानांना घेऊन जात होते. मात्र सकाळी 10 वाजून 43 मिनिटांनी हेलिकॉप्टरचा अपघात झाला. एका झुलत्या पुला व्यतिरिक्त घटनास्थळी पोहोचण्यासाठी मार्ग नसल्यामुळे लष्कर आणि हवाई दलाचे तीन संयुक्त पथके एक Mi-17 आणि दोन ध्रुव हेलिकॉप्टरसह बचाव कार्यासाठी पोहोचली आहेत. शिवाय स्थानिक ग्रामस्थही बचाव कार्यात सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

"अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांग जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर दुर्घटनेबद्दलचे वृत्त कळले. ही अत्यंत त्रासदायक बातमी असल्याचं, केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विटर करून म्हटलं आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये ऑक्टोबरमधील ही दुसरी हेलिकॉप्टर दुर्घटना आहे. या महिन्याच्या सुरुवातीला तवांगजवळ चित्ता हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने एका वैमानिकाचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते.

ALH (WSI), ज्याला रुद्र मार्क IV म्हणूनही ओळखले जाते, हे एक शक्तिशाली अटॅक करण्यासाठीचे हेलिकॉप्टर आहे. जे भारतीय सैन्य आणि IAF मध्ये अत्यंत महत्त्वाच्या भूमिका पार पाडण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने डिझाइन आणि विकसित केलेले आहे.