अर्णब यांचा राजीनामा? : नेशन वॉन्टस् टू नो

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

मुंबईः टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त मंगळवारी विविध वेबसाईटवर झळकले आहे. 

गोस्वामी गेले दोन दिवस न्यूजअवर या प्राईम टाईम शोमध्ये दिसलेले नाहीत; तथापि वाहिनीवर गोस्वामींचा समावेश असलेल्या जाहिराती अद्यापी आहेत. 

'इंडियन एक्स्प्रेस'मधील वृत्तानुसार, टाईम्स नाऊच्या संपादकीय सहकाऱयांच्या बैठकीत गोस्वामी यांनी राजीनाम्याची घोषणा केली. स्वतःचे स्वतंत्र काहीतरी सुरू करायचे असल्याचे कारण त्यांनी बैठकीत दिले, असे सांगण्यात येते. 

गोस्वामी यांना नुकतीच वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था सरकारने पुरवली आहे. इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)च्या माहितीनुसार गोस्वामी यांना पाकिस्तान-स्थित अतिरेकी संघटनांकडून धोका आहे. गोस्वामी यांच्या सुरक्षेसाठी 24 तास तब्बल वीस सुरक्षा रक्षकांची नियुक्ती सरकारने केली आहे. 

द टेलिग्राफ दैनिकातून कोलकता येथे गोस्वामी यांनी पत्रकारिता सुरू केली. 1995 नंतर ते एनडीटीव्हीमध्ये दाखल झाले. विक्रम चंद्रा आणि राजदीप सरदेसाई यांच्याबरोबरच गोस्वामी यांच्या कामाचा ठसा एनडीटीव्हीच्या सुरुवातीच्या दिवसांत होता. त्यानंतर 2006 मध्ये ते टाईम्स नाऊमध्ये एडिटर इन चीफ म्हणून रुजू झाले. 

टेलिव्हिजन पत्रकारितेत नवी, आक्रमक आणि काहीशी आक्रस्ताळी वाटणारी शैली गोस्वामी यांनी आणली. स्वतःच्या शोमध्ये स्वतःचीच मते दामटण्याबद्दल गोस्वामी यांच्यावर सातत्याने टीकाही झाली. मात्र, टीकाकार आणि प्रशंसा करणारे या दोन्ही घटकांमध्ये गोस्वामी लोकप्रिय आहेत.

द क्विंट डॉट कॉम या वेबसाईटवरील माहितीनुसार, राजीनाम्याची घोषणा करतानाच गोस्वामी यांनी तब्बल तासभर भाषण केले. 'गेम हॅज जस्ट बिगन' हे वाक्य त्यांनी बैठकीत वारंवार उच्चारले. मुंबईतील मुख्य स्टुडिओतून गोस्वामी यांनी घेतलेल्या बैठकीत देशभरातील त्यांच्या वाहिनीचे पत्रकार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. 

Web Title: Arnab Goswami resignation?: Nation wants to know