टाटा स्टीलच्या तीन हजार कर्मचाऱ्याची जाणार नोकरी ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

टाटा समूहातील महत्त्वाची कंपनी असलेल्या टाटा स्टीलने युरोपातील सुमारे तीन हजार कर्मचारी कामावरून कमी करण्याची शक्‍यता आहे. मागणीत घट आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे टाटा स्टीलने कर्मचारी कपातीचा विचार सुरू केला आहे. 

नवी दिल्ली : टाटा समूहातील महत्त्वाची कंपनी असलेल्या टाटा स्टीलने युरोपातील सुमारे तीन हजार कर्मचारी कामावरून कमी करण्याची शक्‍यता आहे. मागणीत घट आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे टाटा स्टीलने कर्मचारी कपातीचा विचार सुरू केला आहे. 

भारतातदेखील टाटा स्टीलला दुसऱ्या तिमाहीत कंपनीला 255 कोटींचा तोटा झाला आहे. तर त्याआधीच्या याच कालावधीत कंपनीला 60.7 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा स्टीलचे युरोपातील मुख्य कार्यकारी अधिकारी हेनरिक एडम यांनी काही दिवसांपूर्वी कर्मचारी कपातीचे संकेत दिले होते. 

लघू आणि मध्यम उद्योगांमधील रोजगारनिर्मिती ठप्प; रोजगारनिर्मितीचा वेग नीचांकावर 
 

कंपनीने कर्मचाऱ्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्याची योजना आखली आहे. सध्या मागणीत झालेली घट, व्यवसायातील वाढत्या अडचणी आणि अन्य कारणांमुळे कर्मचारी कपातीचा निर्णय घेत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात येणार आहे, त्यातील दोन-तृतीयांश कर्मचारी हे कार्यालयात काम करणारे असतील. मात्र युरोपातील प्रकल्प बंद करण्यात येणार नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

WebTitle : around three thousand tata steel employees in europe may lose their job


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: around three thousand tata steel employees in europe may lose their job