पाकिस्तान फुल झाल्याने भाजप विरोधकांना पाठवतोय चंद्रावर!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 जुलै 2019

पाकिस्तान फुल झाल्यानेच आता भाजपचे नेते विरोधकांना चंद्रावर पाठवत आहेत.

-  अदूर गोपालकृष्णन, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक.

नवी दिल्ली : पाकिस्तान फुल झाल्यानेच आता भाजपचे नेते विरोधकांना चंद्रावर पाठवत आहेत, अशी टीका चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांनी आज (शुक्रवार) केली. तसेच धर्माच्या नावे हिंसा मान्य नाही, असेही त्यांनी सांगितले. 

अदूर गोपालकृष्णन म्हणाले, की जे मला चंद्रावर जाण्याचा सल्ला देत आहेत. त्यांनी मला चंद्रावर जाण्यासाठी तिकिट बुक करुन द्यावे आणि चंद्रावर एक रुम बुक करुन द्यावी. मी चंद्रावर जायला तयार आहे. तिथे राहण्यास मला आनंदच वाटेल, असेही अदूर गोपालकृष्णन यांनी उपरोधिकपणे म्हटले. 

तसेच ते पुढे म्हणाले, मी जो आवाज उठवला. तो सरकारविरोधात किंवा 'जय श्रीराम'च्या घोषणा देणाऱ्यांविरोधात नाही. हा आवाज त्या घटनांविरोधात आहे, जिथे मारहाणीत एखाद्या व्यक्तीची हत्या केली जाते. या घटनांदरम्यान या जयघोषांचा वापर युद्धाच्या घोषणांसारखा केला जातो. त्याविरोधात मी आवाज उठवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrange ticket Filmmaker Adoor Gopalakrishnan to BJP Leaders