काँग्रेसचा दिग्गज नेता येणार अडचणीत; अटक वॉरंट जारी

काँग्रेसचा दिग्गज नेता येणार अडचणीत; अटक वॉरंट जारी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते खासदार शशी थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. तिरुअनंतपुरम येथील स्थानिक न्यायालयाने याबाबतचे वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे थरूर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

शशी थरूर यांनी त्यांच्या 'द ग्रेट इंडियन नोव्हेल' या पुस्तकातून हिंदू महिलांचा अवमान केल्याचा आरोप आहे. या आरोपावरूनच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होतेे . मात्र, ते स्वतः न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले. 

न्यायालयात उपस्थित राहण्याबाबत समन्स

याप्रकरणी न्यायालयात उपस्थित राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यामध्ये नेमके केव्हा उपस्थित राहावे याचा उल्लेख नव्हता, अशी माहिती थरुर यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com