अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट 

वृत्तसंस्था
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

13 जुलै 2011 रोजी आसामच्या तिलोई गावात झालेल्या अपघातात सैनी साह यांचा मृत्यू झाला होता. साह यांच्याकडे रिलायन्स जनरल इन्शुरन्सची विमा पॉलिसी होती. साह यांच्या कुटुंबीयांनी विमा मोबदला मिळवण्यासाठी बिहारमधील मधेपुरा कोर्टात दावा दाखल केला.

पाटणा : विमा दाव्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे प्रमुख अनिल अंबानी यांच्याविरोधात बिहारच्या मधेपुरा सिव्हिल कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे.

13 जुलै 2011 रोजी आसामच्या तिलोई गावात झालेल्या अपघातात सैनी साह यांचा मृत्यू झाला होता. साह यांच्याकडे रिलायन्स जनरल इन्शुरन्सची विमा पॉलिसी होती. साह यांच्या कुटुंबीयांनी विमा मोबदला मिळवण्यासाठी बिहारमधील मधेपुरा कोर्टात दावा दाखल केला. कोर्टाने साह यांच्या कुटुंबीयांस 28 फेब्रुवारी 2017 रोजी 18 लाख 83 हजारांची नुकसान भरपाई नऊ टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले. मात्र दीड वर्ष उलटूनही कंपनीने कोणताही मोबदला दिला नाही. त्यामुळे साह यांच्या कुटुंबीयांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली.

यासंदर्भात न्यायालयाने कंपनीला दोनदा नोटीस बजावली, तरीही प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीचे प्रमुख अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. 

Web Title: arrest warrant issued aginst Anil Ambani in Patna