अश्‍लील संदेश पाठवणारा गजाआड

वृत्तसंस्था
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

सोशल मीडियातून ओळख झालेल्या युवतीचा अश्‍लील संदेश पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी शुक्रवारी वांद्रे बॅन्डस्टॅन्डवर ध्रुमील शाह याच्या मुसक्‍या आवळल्या. तो कल्याणचा रहिवासी आहे. त्याला सोमवार (ता. 13)पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मुंबई : सोशल मीडियातून ओळख झालेल्या युवतीचा अश्‍लील संदेश पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी शुक्रवारी वांद्रे बॅन्डस्टॅन्डवर ध्रुमील शाह याच्या मुसक्‍या आवळल्या. तो कल्याणचा रहिवासी आहे. त्याला सोमवार (ता. 13)पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

तक्रारदार युवती ही खासगी कंपनीत कामाला आहे. सोशल मीडियावरून त्याने तिला आपण परदेशी नागरिक असल्याचे भासवले होते. युवतीला त्याचा संशय आला. त्यानंतर धुम्रील तिला अश्‍लील संदेश पाठवू लागला, असा आरोप आहे.

सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केलेल्या युवतीने त्याला धडा शिकवण्याचे ठरवले. तिने त्याला शुक्रवारी (ता. 10) रात्री वांद्रे बॅन्डस्टॅन्डला भेटायला बोलावले. तो येण्यापूर्वी तिने वांद्रे पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. काही वेळाने तेथे आलेल्या ध्रुमीलचा तिच्याशी वाद झाला. तेथेही त्याने अश्‍लील शेरेबाजी केल्यावर या युवतीने वांद्रे पोलिसांशी फोनवरून संपर्क साधला.
 

Web Title: arrested for sending obscene messages to girl