श्रीनगर : ग्रेनेड हल्ल्यात 15 जखमी; 10 दिवसांतील तिसरा दहशतवादी हल्ला

वृत्तसंस्था
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

दहशतवादी हल्ला दुपारी 1 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास झाला असल्याची माहिती 'पीटीआय' या वृत्तवाहिनीने दिली.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर काही दिवस तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. आता ते पूर्वपदावर येत असताना काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ले सुरू झाले आहेत. 

श्रीनगरमधील मौलाना आझाद रस्ता येथील मुख्य बाजारपेठेत आज दुपारच्या सुमारास काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. या ग्रेनेड हल्ल्यात 15 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना हरिसिंग रस्त्यावरील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. 

दहशतवादी हल्ला दुपारी 1 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास झाला असल्याची माहिती पीटीआय या वृत्तवाहिनीने दिली. त्यानंतर बाजार परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हा भाग उत्तर काश्मीरमधील सोपोर प्रांतात येतो. 

5 ऑगस्टला कलम 370 रद्द केल्याची घोषणा केल्यापासून जम्मू-काश्मीरमधील सर्व सैनिकांना दक्षतेचा इशारा दिला होता. गेल्या 10 दिवसांत जम्मू-काश्मीर खोऱ्यात तिसऱ्यांदा दहशतवादी हल्ला झाला. 26 ऑक्टोबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 6 जवान जखमी झाले होते. 31 ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन प्रांत केंद्रशासित प्रदेश म्हणून केंद्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केले.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- दहशतवादी संघटनांवर पाकचा अंकुश नाही - अमेरिका

- 'या' आहेत सरकारी विभागांमध्ये नोकरीच्या संधी...

- सत्तेच्या समीकरणाबाबत मी बोलणार नाही : फडणवीस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article 370 15 injured in grenade attack in Srinagar