काश्मिरी मुलीने माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तर...

वृत्तसंस्था
Tuesday, 6 August 2019

एखाद्या काश्मिरी मुलीने माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तर मी लग्न करण्यात तयार होईन. मी काश्मीरमध्ये एक मोठा बंगला खरेदी करेन.

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटण्याचे निर्णय घेतल्यानंतर सोशल मीडियावरून अनेकजण स्वागत करताना दिसत आहेत. ट्विटरवरूनही अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात.

अभिनेता कमाल आर खानने (केआरके) याने ट्विट केले असून, सोशल मीडियावर ते व्हायरल होऊ लागले आहे. केआरकेने त्याच्या ट्विटमध्ये काश्मिरी मुलीसोबत लग्न करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे की, 'आता जर एखाद्या काश्मिरी मुलीने माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तर मी लग्न करण्यात तयार होईन. मी काश्मीरमध्ये एक मोठा बंगला खरेदी करेन. चला पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या स्वर्गात सुंदर आयुष्य जगूया.'

जम्मू-काश्मीर मुद्द्यावरील निर्णयाची माहिती मिळताच केआरकेने एकामागोमाग एक ट्विट करण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा कमाल खान याने यावेळी त्यांची स्तुती करताना म्हटले आहे की, 'मला मोदी राज पसंत नव्हते. कारण त्यांनी कोणतीच आश्वासने पूर्ण केली नव्हती. मात्र, आता मला ते आवडले आहेत. कारण त्यांनी कलम 370 नष्ट केले आहे. मोदींनी जर राम मंदिराचेही आश्वासन पाळले तर मी त्यांचा आणखी चाहता होईल.'

दरम्यान, केआरके हा ट्विटरवरून वादग्रस्त ट्विट करून नेहमी चर्चेत असतो. यावेळी सुद्धा तो चर्चेत आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article 370 this actor says now ready to marry a kashmiri girl