कलम 370 रद्द करता येऊ शकत नाही : सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था
बुधवार, 4 एप्रिल 2018

जम्मू-काश्मीरमध्ये असलेले कलम 370 हे जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देण्याबाबत आहे. हे कलम तात्पुरते कलम नाही. 370 हे कलम तात्पुरते नसल्याने यामध्ये कोणताही बदल किंवा रद्द करता येऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने दिले. 

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये असलेले कलम 370 हे जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देण्याबाबत आहे. हे कलम तात्पुरते कलम नाही. 370 हे कलम तात्पुरते नसल्याने यामध्ये कोणताही बदल किंवा रद्द करता येऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने दिले. 

जम्मू-काश्मीर राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून कलम 370 लागू करण्यात आले आहे. या कलमांतर्गत राज्याला विशेष राज्याचा दर्जा प्राप्त होतो. त्यामुळे या कलममध्ये बदल केला जावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. कुमारी विजयालक्ष्मी झा यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायमूर्ती आदर्श के. गोयल आणि आर. एफ. नरिमन यांनी कलम 370 हे तात्पुरते कलम नसून, त्यामध्ये बदल किंवा ते रद्द करता येऊ शकत नाही, असे मत नोंदवले. 

दरम्यान, केंद्र सरकारला कलम 370 बाबत विचार करण्यास मर्यादा आहे. त्यामुळे यामध्ये बदल किंवा रद्द करणे, हे अशक्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. 
 

Web Title: Article 370 will not be withdrawn says Supreme Court