काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले 'ते' नेते सध्या काय करतात?

टीम ई-सकाळ
बुधवार, 11 मार्च 2020

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांचा हा निर्णय अयशस्वी ठरला.

मध्य प्रदेशात झालेल्या राजकीय भूकंपामुळे काँग्रेस पक्ष बॅकफूटवर पडला आहे. काँग्रेसला हात दाखवत बुधवारी (ता.११) ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. 

ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणे अनेकांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये जाणे पसंत केले. ते नेते सध्या कुठे आहेत, काय करत आहेत, भाजपने त्यांना सामावून घेतले आहे का? किंवा या नेत्यांनी भाजपची विचारसरणी आत्मसात केली आहे का? याचा आपण आढावा घेऊ या.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रीता बहुगुणा जोशी :- 

Image may contain: 1 person, close-up

काँग्रेसमधील बड्या नेत्या अशी ओळख असलेल्या रीता बहुगुणा जोशी यांनी २०१६ मध्ये भाजप प्रवेश केला. त्यांनी २०१७ ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लखनऊ कँटमधून लढविली होती. त्यावेळी रीता यांनी समाजवादी पार्टीच्या मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव यांना पराभूत केले होते. रीता यांना योगी आदित्यनाथ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पद मिळाले होते. त्यानंतर २०१९ मध्ये रीता यांना प्रयागराज लोकसभा मतदारसंघातून भाजपचे तिकीट मिळाल्यावर त्या खासदारही बनल्या आहेत.

- Coronavirus : आता आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

हेमंत बिस्वा शर्मा :- 

Image may contain: 1 person, close-up

पूर्वेकडील राज्यांतील प्रसिद्ध नेत्यांपैकी एक असलेल्या हेमंत शर्मा यांनी २०१५ मध्ये भाजपमध्ये जाणे पसंत केले. पूर्वेकडील राज्यांमध्ये जेव्हा काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते, त्या त्या वेळी शर्मा आपल्या आक्रमक भूमिका घेण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहतात. आसाममधील भाजपच्या विश्वासू नेत्यांमध्ये  शर्मा यांचा समावेश करण्यात येत असल्यामुळेच त्यांच्यावर वित्त, शिक्षण आणि आरोग्य विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

जगदंबिका पाल :- 

Image may contain: 1 person, close-up

जगदंबिका पाल यांनी २००९ ची १५ वी लोकसभा निवडणूक डोमरियागंजमधून काँग्रेसच्या तिकीटावर लढविली. त्यावेळी त्यांनी भाजपच्या जयप्रताप सिंह यांचा ७६,५६६ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये देशात मोदी लाट आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाल यांनी बसपाच्या मुहमंद मुकीम यांना पराभूत केले होते. पाल यांची वेगळी ओळख म्हणजे उत्तर प्रदेशचे एक दिवसाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. 

- एकच नंबर! पेट्रोल झालं स्वस्त, नवे दर बघा...

चौधरी बीरेंद्र सिंह :- 

Image may contain: 1 person, standing

२०१४ मध्येच काँग्रेस सोडत चौधरी बीरेंद्र सिंह भाजपमध्ये आले. एनडीए सरकारमध्ये त्यांनी विकास, पंचायती राज आणि पेयजल विभागाचा कारभार पाहिला. तसेच २०१६-१९ या काळात त्यांनी केंद्रीय पोलाद मंत्री पदही सांभाळले होते. या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा अचानक राजीनामा दिल्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले होते. 

राधाकृष्ण विखे-पाटील :- 

Image may contain: 1 person, sunglasses and close-up

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांचा हा निर्णय अयशस्वी ठरला. त्यांचा मुलगा सुजय विखे-पाटील यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर राधाकृष्ण यांनीही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे कमळ हाती घेतले. काँग्रेसमध्ये असताना ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. मात्र, राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चीतपट करत महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे विखे-पाटील हे सध्या भाजपमध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

नारायण राणे :- 

Image may contain: 2 people, close-up

महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे नेते अशी ओळख असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनीही विखे-पाटील यांचा कित्ता गिरवत भाजपशी हातमिळवणी केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राणे यांनी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन केला. आणि आपल्या दोन्ही मुलांसह (नितेश आणि नीलेश) त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, राज्यात सत्ता स्थापन करण्यात भाजपला अपयश आल्यामुळे राणेंही कमालीचे नाराज झाले आहेत. तसेच भाजपने अजूनही राणेंवर कोणती जबाबदारी टाकलेली नाही. 

- ज्योतिरादित्यांमुळं आता संपूर्ण शिंदे कुटुंब भाजपमध्ये; आजीने रचला होता पाया 

एस. एम. कृष्णा :- 

Image may contain: 1 person, glasses and close-up

१९९९-२००४ मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि २००४-०८ महाराष्ट्राचे राज्यपालपद भूषविलेले एस. एम. कृष्णा हे काँग्रेसचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जात. मात्र, २०१७ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी भाजप प्रवेश केला. २२ मार्च २००९ ला तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कृष्णा यांच्यावर परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी सोपविली होती. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि तीन वेळा केंद्रीय मंत्रीपद भूषविलेल्या कृष्णा यांच्याकडे सध्या कोणतेच पद नाहीय. आणि भाजपनेही त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपविली नाही.

- देशभरातील बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about congress leaders who joined BJP before Jyotiraditya Scindia