'नोटाबंदीनंतर अर्थमंत्री, अर्थसचिव, आर्थिक सल्लागार निष्क्रिय'

वृत्तसंस्था
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर चलनाचा जो तुटवडा जाणवत आहे त्यावर केंद्र सरकारने कोणतीही तातडीची तयारी केली नसल्याचे म्हणत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास, आणि केंद्राचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम निष्क्रिय असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना स्वामी म्हणाले, "मे 2014 नंतर या निर्णयाला उशिर झाला कारण पूर्वतयारी सुरू होती. पण मला असे समजले आहे की अर्थमंत्रालयाने काहीही तयारी केली नव्हती. सगळे काही तात्पुरते आहे. मी अरविंद सुब्रमण्यम आणि शक्तिकांत दास यांना हटविण्याची मागणी केली होती. मात्र जेटली यांनी त्यांचे रक्षण केले. आता आपण पाहत आहोत की त्यांनी काहीही काम केलेले नाही. कोणीतरी जबाबदार असणे आवश्‍यक आहे.' मात्र सुब्रमण्यम स्वामी यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच या निर्णयामुळे दहशतवाद्यांना होणारा निधी पुरवठा कमी होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केले. "नोटाबंदीमुळे लोकांना त्रास होत आहे. मात्र त्यास सामोरे जाता येईल. पंतप्रधान लवकरच प्राप्तीकर रद्द करून टाकतील आणि लोकांना पुन्हा खूष करतील', अशी शक्‍यताही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Arun Jaitley, Arvind Subramanian and Shaktikanta Das sitting idle to tackle currency crunch: Subramanian Swamy