राफेल करारावरुन अरुण जेटली यांचे राहुल गांधीना प्रत्युत्तर

वृत्तसंस्था
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी प्रत्येक भाषणात राफेल विमानाची वेगवेगळी किंमत सांगतात, असं जेटली यांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीत जेटली बोलत होते. काँग्रेसनं राफेल विमान खरेदी संदर्भात केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आणि तथ्यहीन आहेत, असेही जेटली यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली- राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी प्रत्येक भाषणात राफेल विमानाची वेगवेगळी किंमत सांगतात, असं जेटली यांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीत जेटली बोलत होते. काँग्रेसनं राफेल विमान खरेदी संदर्भात केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आणि तथ्यहीन आहेत, असेही जेटली यांनी म्हटले आहे.

'राहुल गांधी त्यांच्या प्रत्येक भाषणात राफेल विमानाची वेगवेगळी किंमत सांगतात. आतापर्यंत त्यांनी राफेल विमानाच्या सात वेगवेगळ्या किमती सांगितल्या आहेत, असं जेटली म्हणाले. 'काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून दिले जाणारे तर्क प्राथमिक शाळेतील मुलासारखे आहेत. 2007 मध्ये केलेल्या करारापेक्षा आता केलेला करार कित्येक पटींनी चांगला असल्याचे मत जेटलींनी व्यक्त केले. 

जेटली म्हणाले की, काँग्रेस सातत्याने खोटे आरोप करत आहे. या व्यवहारातील खरेपणालाच त्यांनी आरोपी बनवले आहे. एखाद्या व्यवहारासंबंधी महत्वाच्या समितीला टाळून पुढे जाणे, अशा प्रकारे सरकारं चालत नाहीत. मी सगळी माहिती देऊ शकत नाही, परंतु मूळ विमानाच्या किमतीचा विचार केला तर आम्ही केलेली खरेदी काँग्रेसच्या खरेदी करारापेक्षा स्वस्त आहे. काँग्रेस लोकांची दिशाभूल करत असून सर्वांना सर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही याचं भान काँग्रेसनं ठेवायला हवं असंही जेटली यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर, राहुल गांधी राफेल विमान व्यवहाराविषयी जनतेमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी एक मोहीम राबवत असल्याचा आरोपही जेटली यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी ही मोहीम राबवण्यासाठी पैसे खर्च करत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे. तसेच, त्यांनी राहुल गांधी यांना त्यासंदर्भात 15 प्रश्न विचारले आहेत, आणि त्याची उत्तरे देण्यास सांगितले आहे.
 

Web Title: arun jaitley criticise rahul gandhi on rafale deal