जेटली हे गुजरातवरील भार : सिन्हा 

वृत्तसंस्था
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

सर्व बाबींचा सारासार व सखोल विचार न करता "जीएसटी' लागू करण्यात आला. नोटाबंदी व "जीएसटी'च्या रूपाने भारतीय अर्थव्यवस्थेला पाठोपाठ दोन धक्के बसले. आपले अर्थमंत्री गुजराती नाहीत तरीही येथून ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

अहमदाबाद : "केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वस्तू व सेवा कर (जीएसटी) चुकीच्या पद्धतीने लोकांवर लादला. जनतेला झालेल्या त्रासाबद्दल लोकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे. जेटली हे गुजरातच्या जनतेवरील भार असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी आज येथे केली. 

जेटली हे गुजरातमधून राज्यसभेवर निवडून आले आहेत. गुजरातमधील "लोकशाही बचाव आंदोलन' या संस्थेने सिन्हा यांना निमंत्रित केले आहे.

या वेळी पत्रकारांशी बोलताना सिन्हा म्हणाले, "सर्व बाबींचा सारासार व सखोल विचार न करता "जीएसटी' लागू करण्यात आला. नोटाबंदी व "जीएसटी'च्या रूपाने भारतीय अर्थव्यवस्थेला पाठोपाठ दोन धक्के बसले. आपले अर्थमंत्री गुजराती नाहीत तरीही येथून ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत. खरे तर ते गुजरातवरील भारच आहे. ते जर दुसरीकडून निवडून गेले असते, तर अन्य एखाद्या गुजराती व्यक्तीला संधी मिळाली असती.'' 

Web Title: arun jaitley gst demonetisation note ban yashwant sinha bjp modi government