जेटलींनी वैयक्तिक हल्ला केल्याचा आनंदच!: यशवंत सिन्हा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

जेटली यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली आहे. त्यांनी या विषयासंदर्भात मोठे भाषण दिले; मात्र मात्र वैयक्तिक टीका न करण्याच्या अडवानीजींच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. किंबहुना, जेटलींनी माझ्यावर वैयक्तिक हल्ला केला, याचा मला आनंदच आहे!

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी नोटाबंदी व जीएसटीवरुन केंद्र सरकार व विशेषत: अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य केल्यानंतर या प्रकरणाचे राजकीय पडसाद अजूनही उमटत आहेत.

सिन्हा यांनी काल (गुरुवार) "मी जर अर्थमंत्रीपदासाठी इच्छुक असतो; तर जेटलींना संधीच मिळाली नसती,' असे विधान केले होते. जेटली यांनी यावर "80 वर्षांचे इच्छुक' अशी उपहासात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. सिन्हा यांनी या उपहासास प्रत्युत्तर देताना जेटली यांनी "वैयक्तिक हल्ला' केल्याची टीका केली आहे.

"जेटली यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली आहे. त्यांनी या विषयासंदर्भात मोठे भाषण दिले; मात्र मात्र वैयक्तिक टीका न करण्याच्या अडवानीजींच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. किंबहुना, जेटलींनी माझ्यावर वैयक्तिक हल्ला केला, याचा मला आनंदच आहे!,'' अशी प्रतिक्रिया सिन्हा यांनी व्यक्त केली. "आत्तापर्यंत एकाही निवडणुकीत विजय न मिळविणाऱ्या जेटली यांना माझ्यावर टीका करण्याचे धाडस होतेच कसे,' असा टोलाही सिन्हा यांनी यावेळी लगावला.

Web Title: Arun Jaitley has made our political disagreement personal: Yashwant Sinha