arun jaitley
arun jaitley

पाकमध्ये घुसून लादेनला मारलं.. मग काहीही शक्य आहे : जेटली

नवी दिल्ली : अल् कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानमध्ये घुसून मारले जात असेल, तर काहीही शक्य आहे, असे सूचक विधान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे.

अरुण जेटली म्हणाले, की अमेरिका कारवाई करू शकते, तर भारतालाही ते शक्य आहे. लादेनला अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून मारले. त्यामुळे भारताला काहीही करणे शक्य आहे. केंद्र सरकारने 2700 कोटींच्या शस्त्र खरेदीला तातडीची मंजूरी दिली आहे. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

भारताच्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसून बॉम्ब फेकल्याचे पाकिस्तानकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्विट करून याबाबतचा दावा केला आहे. पाकिस्तानी हवाई दलाने पाकिस्तानी तळावरून उड्डाण घेत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार करून हल्ला केल्याचे प्रवक्ते डॉ. महंमद फैजल यांनी म्हटले आहे. भारताच्या हद्दीत तीन किलोमीटरपर्यंत घुसली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com