अरुण जेटलींची निवृत्ती घोषणा; मोदींना लिहिले पत्र

अरुण जेटलींची निवृत्ती घोषणा; मोदींना लिहिले पत्र

नवी दिल्ली: भाजपमधील महत्त्वाचे आणि देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अरुण जेटली यांची प्रकृती ठीक नसल्याने अखेर त्यांनी निवृत्त होण्याचे ठरविले आहे. 

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृती अस्वाथ्यामुळे रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रीपदाचा पदभार सोपवण्यात आला होता. त्यावेळी हंगामी अर्थसंकल्प पीयूष गोयल यांनी सादर केला होता. जेटली यांनी प्रकृती अस्वाथ्यामुळे निवृत्ती घेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कळविले आहे. 
 
गेल्यावेळी पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पीयूष गोयल यांच्यावर हंगामी अर्थ आणि कार्पोरेट मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार सोपवला होता. आता येत्या 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. त्यामुळे आता देशातील महत्त्वाची खाती कोणाकडे जाणार आहेत याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागली आहे. गुरुवारी सायंकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात मोदींचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीसाठी 'बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टिसेक्‍टरल टेक्‍निकल अँड इकोनॉमिक को-ऑपरेशन' (बिम्सटेक) या संघटनेच्या राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण देण्यात आले आहे.

अरुण जेटली यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत उपचार  घेतले होते. यापूर्वी त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यार्पणाची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हाही पीयूष गोयल यांच्याकडेच अर्थमंत्रालयाचा पदभार देण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com