जागतिक व्यवसाय परिषदेला अरुण जेटलींची दांडी?

arun jaitley
arun jaitley

कोलकता: बंगाल जागतिक व्यवसाय परिषदेला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे दांडी मारणार असल्याची शक्‍यता दिसत आहे. भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल कॉंग्रेसमधील राजकीय परिस्थिती याला कारणीभूत ठरणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या 20 आणि 21 जानेवारीला ही परिषद होणार असून, यामध्ये जगभरातील उद्योगपती आणि गुंतवणूकदार उपस्थित राहणार आहेत.

मोदी सरकारच्या नोटाबंदीला विरोध केल्यापासून राज्य सरकार व केंद्रामधील संबंध दुरावल्याचे चित्र आहे. त्यातच तृणमूलचे खासदार तपस पाल आणि सुदीप बंडोपाध्याय यांना अटक झाल्याने ते आणखी ताणले गेले. दरम्यान, येथील स्थानिक पोलिसांनी पश्‍चिम बंगालचे भाजप उपाध्यक्ष आणि प्रवक्ते जयप्रकाश मझुमदार यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली. त्यांच्यावर शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) सुमारे सात लाख 20 हजारांचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांनी अनेक शिक्षकांना नोकरीचे आश्‍वासन दिले; परंतु या परीक्षेत गुणवत्ता दाखविलेल्या विद्यार्थ्यांनाही नोकऱ्या नाकारल्या जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

जयप्रकाश यांच्या अटकेमुळे वातावरण चांगलेच तापले असून, यामुळेच जेटली या परिषदेला दांडी मारतील, असे मानले जात आहे. दरम्यान, भाजपच्या नेत्यांनीही जेटली यांनी या परिषदेपासून दूर राहावे, असा सूर आळवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com