'तो' सर्जिकल नव्हे फर्जिकल स्ट्राईक: अरुण शौरी

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 जून 2018

काश्मीर आणि पाकिस्तानच्या बाबतीत सरकारचे कोणतेच धोरण नाही. काश्मीरमधील नागरिकांनीही आपण बळी पडत आहोत, याचे राजकारण करू नये. फर्जिकल स्ट्राईक या शब्दाचा वापर मी लष्करासाठी नाही, तर सरकारसाठी केला आहे.

नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते अरुण शौरी यांनीच सर्जिकल स्ट्राईकवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला करत सर्जिकल स्ट्राईकला फर्जिकल स्ट्राईक असे म्हटले आहे. लष्कर आपले काम करत आहे अन् सरकार आपली थोपटून घेत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते सैफुद्दीन शोज यांनी काश्मीरमधील परिस्थितीवर लिहिलेल्या 'गलिम्प्सेज ऑफ हिस्ट्री अँड द स्टोरी ऑफ स्ट्रगल' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात शौरी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंहही उपस्थित राहणार होते, पण ते अनुपस्थित राहिले. या कार्यक्रमात शौरी यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

शौरी म्हणाले, ''काश्मीर आणि पाकिस्तानच्या बाबतीत सरकारचे कोणतेच धोरण नाही. काश्मीरमधील नागरिकांनीही आपण बळी पडत आहोत, याचे राजकारण करू नये. फर्जिकल स्ट्राईक या शब्दाचा वापर मी लष्करासाठी नाही, तर सरकारसाठी केला आहे. या सरकारकडे न काश्मीर, न पाकिस्तान आणि न चीनबाबत धोरण आहे. सरकारकडून सांगण्यात येत असलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.''

काँग्रेस नेते सैफुद्दीन शोज म्हणाले, की या पुस्तकाशी काँग्रेसचा काही संबंध नाही. खूप संशोधन करून मी हे पुस्तक लिहिले आहे. माध्यमांनी माझ्या वक्तव्यांचा विपर्य़ास केला. 

Web Title: Arun Shourie says surgical strike against pakistan and termed it as farzical strike