मोदींसारखा मूर्ख "पीएम' पुन्हा नको: शौरी

वृत्तसंस्था
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

पुढच्या वेळी जनतेने कुटूंब असलेल्या व्यक्तीस पंतप्रधान म्हणून निवडावे. कारण कुटूंब असलेली व्यक्तीच घरगुती अडचणी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकेल. जनतेस केवळ स्वत:च्या हेतुकरिता वापरुन घेणाऱ्या मनुष्याची निवड पंतप्रधान म्हणून केली जाऊ नये

नवी दिल्ली - 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनामधून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी नेते व अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेल्या अरुण शौरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीव्र टीका केली आहे. जनतेने पुढच्या वेळी असा "मूर्ख' पंतप्रधान न निवडता कुटूंब असलेल्या व्यक्तीसच पंतप्रधान म्हणून निवडावे, असे टीकास्त्र शौरी यांनी सोडले आहे.

""पुढच्या वेळी जनतेने कुटूंब असलेल्या व्यक्तीस पंतप्रधान म्हणून निवडावे. कारण कुटूंब असलेली व्यक्तीच घरगुती अडचणी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकेल. जनतेस केवळ स्वत:च्या हेतुकरिता वापरुन घेणाऱ्या मनुष्याची निवड पंतप्रधान म्हणून केली जाऊ नये,'' अशी घणाघाती टीका शौरी यांनी केली आहे.
केंद्रामध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर शौरी यांनी विविध मुद्यांवरुन सरकार व मोदींना सतत लक्ष्य केले आहे.

500 व 1000 रुपयांच्या नोटांवरील बंदीवरुन देशभरात वादळ निर्माण झाले असताना शौरी यांनीही केलेली ही टीका अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.

Web Title: Arun Shourie slams Narendra Modi, again