अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पक्षातून तात्पुरते निलंबित 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

इटानगर : 'पक्षविरोधी कारवाया केल्या'च्या आरोपावरून अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चोवना मेईन यांनाच सत्ताधारी 'पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश'ने (पीपीए) काल (गुरुवार) रात्री तात्पुरते निलंबित केले. यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अन्य पाच आमदारांवरही 'पीपीए'ने कारवाई केली आहे. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर 'पक्ष कार्यकर्त्यांनी मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज राहावे' असा सल्ला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाडी रिचो यांनी दिला आहे. 

अरुणाचल प्रदेशमध्ये गेले काही महिने प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी होत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्याऐवजी खांडू यांच्याकडे पक्षाने 16 जुलै रोजी जबाबदारी सोपविली. तुकी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचे सरकार राजकीय अस्थिरतेमुळे गेल्या जानेवारीमध्ये पडले. त्यानंतर केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यानंतर कालिको पुल यांच्या नेतृत्वाखालील सरकार 19 फेब्रुवारी रोजी सत्तेत आले. त्यानंतर 29 आमदारांसह पुल यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून 'पीपीए'मध्ये प्रवेश केला. मात्र, भाजपचा पाठिंबा असलेल्या या नव्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने हटविले. त्यानंतर कॉंग्रेसने खांडू यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविले. 

सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्री खांडू, सभापती तेन्झिंग नोर्बु यांच्यासह 41 नेते 'पीपीए'मध्ये दाखल झाले. यामुळे अवघ्या काही महिन्यांपूर्वी सत्तेत असलेल्या कॉंग्रेसकडे आता माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या रुपाने अरुणाचल प्रदेशमध्ये एकमेव आमदार उरला आहे.

Web Title: Arunachal Pradesh Chief Minister Pema Khandu Suspended By His Party