अरुणाचलमध्ये बांधणार 43 नवे रस्ते व 15 पूल

वृत्तसंस्था
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

केंद्रीय ग्रामिण विकास मंत्रालयाचे संचालक पी.मनोजकुमार यांनी स्वाक्षरी केल्याचे राज्याच्या आयुक्तांनी सांगितले. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या निधीचा पुर्णपणे रस्ते विकासासाठी वापर केला जाईल असे आश्‍वासन दिले, असे आज प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

इटानगर - अरुणाचल प्रदेशमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 43 रस्ते आणि 15 पुल उभारणीस लागणाऱ्या 706.47 कोटी रुपयांच्या निधीस ग्रामीण विकास मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

केंद्रीय ग्रामिण विकास मंत्रालयाचे संचालक पी.मनोजकुमार यांनी स्वाक्षरी केल्याचे राज्याच्या आयुक्तांनी सांगितले. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या निधीचा पुर्णपणे रस्ते विकासासाठी वापर केला जाईल असे आश्‍वासन दिले, असे आज प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

राज्यात 684.46 किमीचे रस्ते आणि 577 मिटरचे पूल बांधायचे आहेत. त्यासाठी 706.47 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

Web Title: arunachal pradesh roads