अरुणाचल प्रदेशमध्ये ‘वेल कम टू चायना’

पीटीआय
सोमवार, 30 एप्रिल 2018

इटानगर - चीनची घुसखोरी भारतासाठी नेहमीच डोकेदुखी राहिली आहे. डोकलामनंतर उभय देशांतील संबंध काही प्रमाणात निवळल्याचे वाटत असतानाच चीनने आता डिजिटल तंत्राला हाताशी धरून ‘तांत्रिक घुसखोरी’चा प्रयत्न केला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये काही भागात  मोबाईल नेटवर्क येताच ‘वेलकम टू चायना’ असे संदेश येत असल्याचा अनुभव काहींना येत आहे. एवढेच नाही तर मोबाईलवर चिनी भाषेत संदेशाचा भडिमार होत असून चीनची वेळही दाखवत आहे.

अरुणाचल प्रदेशच्या झिडो, गिलिंग गावातील नागरिकांना असा अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी कोणत्याही फोनमध्ये चीन कंपनीचे नेटवर्क येत आहे. नेटवर्क येताच वेलकम टू चीन असे संदेश येतात. हा मागासलेला भाग आहे. या ठिकाणी रस्त्याची सुविधा नाही. जमीन खचण्याचे प्रकार इथे वारंवार घडतात. भारत आणि चीन बॉर्डरच्या (लाइन ऑफ ॲक्‍च्यूअल कंट्रोल) पलीकडे चीनने पायाभूत रचना केली आहे. तेथे तीन मजली इमारत, रस्त्याचे सपाटीकरण आदी काम झालेले दिसते.

Web Title: arunachal pradesh welcome to china message on mobile