जेटलींकडून केजरीवाल यांच्यावर आणखी एक मानहानीचा दावा

वृत्तसंस्था
सोमवार, 22 मे 2017

गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणी दरम्यान जेटली यांनी जेठमलानींच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदविला होता. वैयक्तिक आरोप करणे योग्य नसल्याचे म्हटले होते. 

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आणखी एक मानहानीचा दावा दाखल केला असून, त्यांनी 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात जेटलींनी हा दावा दाखल केला आहे. यापूर्वीही जेटली यांनी केजरीवाल यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केलेला आहे. याची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात सुरु आहे. गेल्या आठवड्यात केजरीवाल यांचे वकील राम जेठमलानी यांनी जेटलींना धूर्त असा शब्द उच्चारला होता. त्यानंतर जेठमलानी यांनी आपण हे सर्वकाही केजरीवाल यांच्या सांगण्यानुसार करत असल्याचे म्हटले होते. यामुळे जेटली यांनी केजरीवाल यांच्याविरोधात आणखी एक मानहानीचा दावा दाखल केला.

गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणी दरम्यान जेटली यांनी जेठमलानींच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदविला होता. वैयक्तिक आरोप करणे योग्य नसल्याचे म्हटले होते. 

Web Title: ArunJaitley files an additional Rs 10 cr defamation suit against Delhi CM Arvind Kejriwal