भगवंत मान यांनी दारू सोडल्याचा केजरीवालांना आनंद

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 जानेवारी 2019

बर्नाला (पंजाब) : आम आदमी पक्षाचे (आप) वरिष्ठ नेते व खासदार भगवंत मान यांनी दारू सोडण्याचा निर्णय रविवारी (ता. 20) जाहीर केला. त्यावर "आप'चे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आनंद व्यक्त करीत "हा खूप मोठा त्याग असून, भगवंत मान यांनी माझे मन जिंकले', अशी भावना व्यक्त केली. 

बर्नाला येथे "आप'ने काल आयोजित केलेल्या एका सभेत मान यांनी "आईच्या सल्ल्यानुसार दारू सोडत आहे,' अशी जाहीर घोषणा केली. मान हे मद्यपी असून सतत नशेत असतात, अशी टीका त्यांच्या राजकीय विरोधकांकडून केली जाते. याचा संदर्भ देत मान म्हणाले की, "विरोधकांकडून होणारी ही टीका मला सतत बोचत होती. माझे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करून माझी बदनामी केली जात असल्याचे मी पाहिले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून मी दारू सोडली असून, आयुष्यात पुन्हा कधीही दारूला स्पर्श करणार नाही, अशी प्रतिज्ञा केली आहे. 
मान यांनी दारू सोडण्याची घोषणा केली त्या वेळी व्यासपीठावर केजरीवाल व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाही उपस्थित होते. 
दरम्यान, भगवंत मान यांच्या तोंडाला दारूचा वास येत असल्याने आपले आसन त्यांच्यापासून दूर ठेवण्याची विनंती आम आदमी पक्षाचे निलंबित खासदार यांनी 2016 मध्ये लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे केली होती. 

मान यांनी दारू पिणे सोडले ही आनंदाची बाब आहे. त्यांनी माझे मन जिंकले आहे. एवढेच नाही तर पूर्ण पंजाबचेही मन जिंकले आहे. नेता असाच हवा, जो जनतेसाठी कशाचाही त्याग करण्याची तयारी ठेवेल. अशा तऱ्हेची शपथ घेणे ही सोपी गोष्ट नाही. 
- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, नवी दिल्ली 

Web Title: Arvind Kejariwal happy for Bhagwant Maan