मोदींमुळेच माझे नाव FIR मध्ये: केजरीवाल

यूएनआय
बुधवार, 21 सप्टेंबर 2016

#ModiTargetsKejriwal ट्विटरवर ट्रेण्डमध्ये 
नरेंद्र मोदी केजरीवाल यांना लक्ष्य करत आहेत का? याबाबत सोशल मिडियावर चर्चा सुरू आहे. त्यामुळेच आज #ModiTargetsKejriwal हा विषय ट्विटरवर ट्रेण्डमध्ये आला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या अनुमतीशिवाय एखाद्या मुख्यमंत्र्याचे नाव "एफआयआर‘मध्ये येऊच शकत नसल्याचे म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर टीका केली आहे. 

दिल्ली महिला आयोगातील गैरप्रकारांची भ्रष्टाचार विरोधी विभागाने पोलिसांकडे तक्रार केली आहे. तक्रारीच्या प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) केजरीवाल यांच्या नावाचाही समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, "या प्रकारणाच्या एफआयआरमध्ये माझे नाव का आले ते मला समजत नाही. माझी त्यात काय भूमिका होती? "एफआयआर‘मध्येही त्याबाबत काहीही लिहिलेले नाही.‘ गेल्या काही महिन्यांमध्ये दिल्ली सरकारविरुद्ध होत असलेल्या घटनांबाबत चर्चा करण्यासाठी दिल्ली सरकार विधानसभेचे विशेष सत्र बोलाविणार असल्याचेही केजरीवाल यांनी यावेळी सांगितले. 

 

Web Title: Arvind Kejriwal again targets PM Narendra Modi