राजधानी दिल्लीतील हॉटेल ‘कोरोनामुक्त’ 

arvind-kejriwal
arvind-kejriwal

नवी दिल्ली - राजधानीत कोविड-१९ ची स्थिती सुधारत असल्याने  हॉटेलमध्ये उभारण्यात आलेले विलगीकरण कक्ष बंद केले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच रुग्णांची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेता दिल्ली सरकारने उपचारासाठी हॉटेल ताब्यात घेतले होते, मात्र या हॉटलमधील खाटा रिक्त असल्याने हा निर्णय घेण्यात आला. 

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कोविड-१९ च्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला. यासंदर्भात केजरीवाल यांनी ट्विटरवर म्हटले, की कोविडच्या रुग्णांसाठी काही हॉटेल ताब्यात घेतले आणि त्यांना रुग्णालयाशी जोडले होते. परंतु आता राजधानीतील स्थिती चांगली झाल्याने ताब्यात घेतलेले हॉटेल आता वेगळे केले जात आहेत. गेल्या महिन्यात कोविड-१९ चे रुग्ण वाढल्यानंतर आप सरकारने शहरातील सुमारे ४० हॉटेल ताब्यात घेतले. यासाठी कोविड-१९ साठी १२,६३३ खाटा आरक्षित केल्या होत्या. तसेच कोविड रुग्णाच्या देखभाल केंद्रातील ४७,०० हून अधिक खाटा होत्या. मात्र या दोन्ही खाटा रिक्त पडलेल्या होत्या. कालपर्यंत शहरातील १०,८८७ रुग्णांवर उपचार सुरू होते आणि त्यापैकी ६२१९ रुग्ण घरातच क्वारंटाइन आहेत. मार्गदर्शक सूचनांनुसार किरकोळ लक्षणे असलेल्या रुग्णांना हॉटेलमध्ये ठेवले जात असत आणि मुलभूत सुविधा दिल्या जात होत्या. प्रकृती ढासळल्यास रुग्णालयात दाखल केले जात होतेे. परंतु आता रुग्णांची संख्या कमी होत असल्याने हॉटेल ताब्यात ठेवण्याची आवश्‍यकता नाही, असे सरकारच्या निदर्शनास आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘आरटी-पीसीआर’ची अंमलबजावणी प्रभावीपणे
कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना नवी दिल्लीतील चाचण्यांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यात आरटी-पीसीआर ( Reverse Transcription Polymerase Chain Reaction) चाचण्या करण्याबाबत कडक अंमलबजावणी केली जाईल, असे म्हटले आहे. दिल्लीत आरटी-पीसीआर ऐवजी रॅपिड ॲटिजिन चाचण्या अधिक होत आहेत. ॲंटिजिन चाचण्याचे अहवाल विश्‍वासपात्र नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णांची ॲटीजेन चाचणी निगेटिव्ह असली आणि किरकोळ लक्षणे असली तरी त्याची आरटी-पीसीआर चाचणी करणे गरजेचे असून यासंदर्भात  मार्गदर्शक सूचनांचे अधिकाऱ्यांनी पालन करावे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com