केजरीवाल, देवाची तरी भीती बाळगा : कपिल मिश्रा यांच्या आईचे पत्र

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 मे 2017

आम आदमी पक्षातून निलंबित झालेले नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांच्या आई डॉ. अन्नपूर्णा मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. "माझा मुलगा कोणाचा एजंट नसून तो सत्याचा एजंट आहे. केजरीवाल, खोटेपणा तुमच्या कामी येणार नाही. देवाची तरी भीती बाळगा!', अशा शब्दांत त्यांनी केजरीवाल यांना सुनावले आहे.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षातून निलंबित झालेले नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांच्या आई डॉ. अन्नपूर्णा मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. "माझा मुलगा कोणाचा एजंट नसून तो सत्याचा एजंट आहे. केजरीवाल, खोटेपणा तुमच्या कामी येणार नाही. देवाची तरी भीती बाळगा!', अशा शब्दांत त्यांनी केजरीवाल यांना सुनावले आहे.

केजरीवाल यांनी कपिल मिश्रा यांना भारतीय जनता पक्षाचे एजंट असल्याचे म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर कपिल मिश्रा यांच्या आई डॉ. अन्नपूर्णा मिश्रा यांनी केजरीवालांना पत्र लिहिले आहे. हे पत्र कपिल मिश्रा यांनी त्यांच्या ट्विटरद्वारे शेअर केले आहे. "केजरीवाल हे माझे पहिले आणि शेवटचे पत्र आहे. माझा मुलगा तुम्हाला प्रश्‍न विचारेल आणि तुम्ही त्यापासून दूर पळाल असा विचार मी कधीही केला नव्हता ज्या ज्या वेळी तुम्ही मला भेटला त्या त्या वेळी तुम्ही सार्वजनिक जीवनातील पारदर्शिकतेबाबत चर्चा केली. प्रत्येक गोष्टीला जनतेसमोर ठेवण्याबाबत चर्चा केली. आज तुम्ही माझ्या मुलाला भाजपचा एजंट म्हणत आहोत. तुमचे सहकारी बनावट फोटो शेअर करत आहेत. अरविंद हा किती खोटेपणा? आणखी किती खोटेपणा करणार आहात?', अशा शब्दांत अन्नपूर्णा यांनी केजरीवालांना फटकारले आहे.

पूर्व दिल्ली महानगरपालिकेच्या डॉ. अन्नपूर्णा पहिल्या महापौर होत्या. केजरीवाल यांनी "स्वराज' या त्यांच्या पुस्तकात आपल्या कामाचे कौतुक केल्याची आठवण अन्नपूर्णा यांनी पत्रातून करून दिली आहे. "एक आई होण्याच्या नाते मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की माझ्या मुलाने थोडीशी माहिती मागितली आहे. ती त्याला द्यावी. तो भाजपचा नव्हे तर सत्याचा एजंट आहे', असे आवाहन अन्नपूर्णा यांनी केले आहे.

Web Title: 'Arvind (Kejriwal), Be Afraid Of God': Letter From Kapil Mishra's Mother