अरविंद केजरीवालांना न्यायालयाचा दिलासा

पीटीआय
मंगळवार, 3 एप्रिल 2018

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माफी मागितल्यानंतर आता दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्यावर भरलेला दहा कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा खटला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माफी मागितल्यानंतर आता दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्यावर भरलेला दहा कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा खटला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

एका खटल्याच्या सुनावणीप्रसंगी केजरीवालांचे वकील राम जेठमलानी यांनी अरुण जेटली यांच्यावर आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती, यानंतर जेटली यांनी केजरीवाल आणि त्यांच्या अन्य पाच सहकाऱ्यांविरोधात अब्रूनुकसानीचा दुसरा खटला भरला होता. याप्रकरणी जेटली आणि केजरीवाल या दोघांनी तडजोड अर्ज केला त्यानुसार न्यायालयाने "आप' प्रमुखांचा माफीनामा स्वीकारत हा खटलाच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या सुनावणीवेळी केजरीवाल यांची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ अनुपम श्रीवास्तव यांनी मांडली.

Web Title: Arvind Kejriwal Delhi High Court