केजरीवालांविरुद्ध कायदेशीर कारवाईचे आदेश

वृत्तसंस्था
रविवार, 29 जानेवारी 2017

'जे पक्ष तुम्हाला पैसे देतील त्यांच्याकडून पैसे घ्या. मात्र, मत फक्त आम आदमी पक्षालाच द्या', असे विधान केजरीवाल यांनी गोवा येथे झालेल्या जाहीरसभेत केले होते. केजरीवाल यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या कायदेशीर कारवाईची माहिती 31 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत.

नवी दिल्ली : गोवा येथील जाहीर सभेत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

"आठ जानेवारी रोजी गोवा येथे केलेल्या वक्तव्याबद्दल केजरीवाल यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी', असे आदेश निवडणूक आयोगाने दिल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. "जे पक्ष तुम्हाला पैसे देतील त्यांच्याकडून पैसे घ्या. मात्र, मत फक्त आम आदमी पक्षालाच द्या', असे विधान केजरीवाल यांनी गोवा येथे झालेल्या जाहीरसभेत केले होते. केजरीवाल यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या कायदेशीर कारवाईची माहिती 31 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत.

आठ जानेवारी रोजी दक्षिण गोव्यातील बरदेज तालुक्‍यातील मापुसा येथे झालेल्या जाहीर सभेत केजरीवाल यांनी मतदारांना लाच घेण्यास प्रोत्साहित करणारे विधान केल्याबद्दल निवडणूक आयोगाने केजरीवाला यांच्यावर टीका केली होती.

Web Title: Arvind Kejriwal as Election Commission orders FIR, complaint against him