40च्या बदल्यात 400 मारा: अरविंद केजरीवाल

वृत्तसंस्था
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले असून, 40च्या बदल्यात पाकिस्तानचे 400 मारा असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले असून, 40च्या बदल्यात पाकिस्तानचे 400 मारा असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या 1 मार्चपासून बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. राज्याच्या मागणीसाठी संपूर्ण दिल्लीत आंदोलनाची गरज असल्याचे केजरीवाल म्हणाले. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाल्यानंतरच उपोषण संपेल, असेही ते म्हणाले. केजरीवाल यांनी आपल्या भाषणातून केंद्र सरकारवर टीका केली. केजरीवाल म्हणाले, 'की जनतेने आम्हाला 70 ते 67 जागा दिल्या आहेत. तरीही आम्ही दिल्लीसाठी पुरेशी जबाबदारी पार पाडण्यास असमर्थ ठरत आहोत. आम्ही दिल्लीसाठी प्रसंगी बलिदानही देऊ. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आतापर्यंत दिल्लीवर अन्यायच झाला आहे. निर्वाचित सरकार दिल्लीच्या नागरिकांसाठी काम करू शकत नाही.'

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर बोलताना मोदी व भाजपवर टीका करताना केजरीवाल म्हणाले, 'पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन भाजप राजकारण करत आहे. पाकिस्तानच्या विरोधात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहोत. मात्र, सत्ताधारी भाजपने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कठोर पाऊले उचलली पाहिजे. पाकिस्तान सीमेवर जे हवे आहे, ते करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानच्या बाबतीत चुकीचा संदेश देण्याचे काम केले आहे. पंतप्रधान निमंत्रण नसताना नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला पाकिस्तानला गेले होते. त्यामुळे पाकिस्ताने आपल्याला कमजोर समजले. दुसरे म्हणजे, पठाणकोटमध्ये आम्ही आयएसआयला चौकशीसाठी बोलविले. मात्र, त्यांच्याच दहशतवाद्यांनी एअरबेसवर हल्ला केला. ते आमचे 40 मारतात, तर आम्ही त्यांचे 400 मारले पाहिजेत. तरच पाकिस्तान आपल्यासोबत बरोबरीची भाषा समजेल. अथवा, आपल्याला कमजोर समजतील.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arvind Kejriwal to go on indefinite fast from 1 March