Mamata Banerjee
Mamata Banerjeeesakal

Mamata Banerjee Video : केजरीवाल ममतांच्या भेटीला; सर्व विरोधी पक्षांनी अध्यादेशाला विरोध करण्याचं आवाहन

कोलकाताः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी केंद्राच्या अध्यादेशाला सर्वपक्षियांनी विरोध करण्याचं आवाहन केलं आहे. ममता बॅनर्जी यांनीही दिल्ली सरकारला साथ देत आपण सुप्रीम कोर्टाचा आदर करत असल्याचं म्हटलं आहे.

अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली त्यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री आतिशी, खासदार संजय सिंह आणि राघव चड्डा यांचीही उपस्थिती होती.

Mamata Banerjee
Wrestler Protest : नव्या संसद भवनासमोर पहिलं आंदोलन! कुस्तीपटू भरवणार महिलांची महा पंचायत

अरविंद केजरीवाल म्हणाले की, आमच्या सरकारला काम करु दिलं जात नाहीये. आम्ही काम करण्याच्या तयारीत आहोत परंतु आमच्याकडे ताकद नाहीये. सीबीआयचा चुकीचा वापर होत आहे. संपूर्ण देशातील सरकारांना त्रास दिला जात आहे.

ममता मॅनर्जी यांनीही सांगितलं की, अध्यादेशाच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. आमचा पक्ष या अध्यादेशाचा विरोध करणार आहे. तर केजरीवार म्हणाले, २०१५मध्ये पहिल्यांदा सरकार आलं तेव्हा नोटिफिकेशन जारी करुन दिल्ली सरकारचं बळ काढून घेतलं गेलं. ८ वर्षांनंतर आता सुप्रीम कोर्टाचा आदेश आलेला आहे. आता पुन्हा त्या निर्णयाला पालटलं आहे, कधी तर कोर्ट सुट्टीवर गेल्यानंतर.

दिल्लीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या 'ट्रान्स्फर पोस्टिंग'चं प्रकरण गाजत आहे. केंद्र सरकार 'राष्ट्रीय राजधानी सिव्हिल सेवा प्राधिकरण' हा अध्यादेश घेऊन येत आहे. संसदेत हा कायदा सहा महिन्यात पास करणं आवश्यक आहे. जर सहा महिन्यात या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर झालं नाही तर अध्यादेश रद्द होईल. दिल्लीच्या उपराज्यपाल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने केजरीवाल सरकारच्या बाजूने निर्णय दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com