सर्व भाजपवाल्यांना क्‍लिन चीट मिळेल: केजरीवाल

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

एका महिन्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग द्या आणि मग बघा

नवी दिल्ली - खाण गैरव्यवहार प्रकरणातून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या निर्दोष मुक्ततेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘लवकरच सर्व भाजपवाल्यांना ‘क्‍लिन चीट‘ मिळेल‘ असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

बेळ्ळारी अवैध खाण गैरव्यवहार प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा व अन्य काही जणांना आज (बुधवार) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने मुक्तता केली. या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी फेसबुकद्वारे नाराजी व्यक्त करत "लवकरच सर्व भाजपवाल्यांना क्‍लिन चीट मिळेल‘ असे म्हटले आहे.

तसेच "ही भारतीय जनता पक्षाची वाईट चाल असून आमच्याकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची शाखा काढून घेऊन आता म्हणतात की तुम्ही काही कारवाई करत नाहीत‘, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच "एका महिन्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग द्या आणि मग बघा‘, असा इशाराही केजरीवाल यांनी दिला आहे.

Web Title: Arvind Kejriwal hits out at BJP again