केजरीवालांचे मोदींना शपथविधीसाठी आमंत्रण

Kejriwal-and-Modi
Kejriwal-and-Modi

नवी दिल्ली - दिल्लीच्या निवडणुकीत एकतर्फी बाजी मारल्यानंतर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल रविवारी (ता. १६) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याला केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले असून, या सोहळ्याला अन्य कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यासह दिग्गज नेत्यांना आमंत्रित करण्यात आलेले नाही हे विशेष.

आपचे नेते अरविंद केजरीवाल हे रविवार १६ फेब्रुवारीला तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दिल्लीकर जनतेला या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले असून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना या सोहळ्याला आमंत्रित करण्यात आल्याचे ‘आप’चे नेते गोपाळ राय यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय भाजपच्या सात खासदारांनाही या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले असून, पंतप्रधान मोदी या सोहळ्यात सहभागी होणार किंवा नाही, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने भाजपचा एकतर्फी पराभव केला असून विधानसभेच्या ७० पैकी ६२ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. तर भाजपला केवळ आठ जागांवर विजय मिळवता आला आहे. तसेच काँग्रेसला येथे एकही जागा मिळवता आली नसून पक्षाच्या ६३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com